Dr. Bharatratna , Sir Mokshagundam Vishveshvarayya Award

 

सहा. कार्यकारी अभियंता श्री. प्रविण कोल्हे यांना प्रधान सचिवांच्या शुभहस्ते

“भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या” पुरस्कार प्रदान

 

      जलसंपदा विभागातील बोर्डीनाला प्रकल्प उपविभाग, मोर्शी येथे सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर नियुक्त झालेले आणि तत्कालीन अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे श्री. प्रविण कोल्हे यांना दिनांक १५ ऑक्टोंबर २०११ रोजी सिंचन भवन, पुणे या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव श्री. एकनाथराव पाटील यांच्या शुभहस्ते “डॉ. भारतरत्न, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार” प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. चंद्रशेखर मोडक, सचिव (लाक्षेवि), श्री. व्यंकटराव गायकवाड, सदस्य (तांत्रिक), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई, श्री. दिपक कंदी, कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे सिंचन महामंडळ, पुणे, श्री. प्रफुल्लचंद्र झपके, कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपुर तसेच वरिष्ट अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

      पुणे विद्यापिठाच्या बी.ई. सिव्हिल परिक्षेमध्ये सन २००४ साली सुवर्णपदक मिळवुन देशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रेसर अशा आय.आय.टी. कानपुर या संस्थेमधुन पदवीत्तर शिक्षण पुर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेमध्ये संपुर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवुन सप्टेंबर २००८ मध्ये श्री. कोल्हे जलसंपदा विभागातील मोर्शी येथील उपविभागामध्ये रुजु झाले. अमरावतीचा सिंचन अनुशेष निर्मुलनार्थ बांधकामाधीन असलेल्या निम्न चारगड व नागठाणा-२ लपा प्रकल्पांचा कार्यभार त्यांचेकडे होता. यापैकी नागठाणा-२ लपा प्रकल्पामध्ये या वर्षी पुर्ण क्षमतेने पाणीसाठा निर्मिती करण्यात आली असुन, प्रकल्पाचे लाभक्षेत्रामध्ये कालव्याऎवजी पाईपलाईनचा पर्याय स्विकारण्याबाबत कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

      श्री. प्रविण कोल्हे, यांची शैक्षणिक गुणवत्ता तसेच जलसंपदा विभागामध्ये केलेले नाविण्यपुर्ण कामाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटना, मुंबई यांच्या वतीने देण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात आली होती. पदोन्नतीच्या उंबरठ्यावर असतानाच प्राप्त झालेल्या या पुरस्काराच्या अनुषंगाने बोलताना श्री. कोल्हे यांनी कर्मचारी संघटनेचे आभार मानले व या पुरस्काराच्या निमित्ताने दिलेले प्रोत्साहन विभागामध्ये अधिकाधिक चांगले काम करण्यास प्रेरणा देत राहील असे सांगुन याचे श्रेय अमरावती विभागातील काम करणारे सर्व अभियंते, विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना तसेच कुटुंबियांना दिले.

 
Water Resources  Civil Engineering Notes  Aamhi Sangamnerkar  Books
© 2006~13 Pravin Kolhe
 
Page Last Updated on 12-02-2014 11:18:56