महाराष्ट्र शासनाच्या
जलसंपदा विभाग, सार्वजनिक
बांधकाम विभाग
आणि
पाणीपुरवठा व
स्वच्छता विभाग अखत्यारीतील महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणामधील खालील पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-अ व गट-ब ही परिक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
घेण्यात येते-
याशिवाय
मृद व जलसंधारण विभागाच्या खालील पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-अ व गट-ब ही परिक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत
घेण्यात येते-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणारी "महाराष्ट्र
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-अ" ही परिक्षा "सहायक
कार्यकारी अभियंता" व "सहायक आभियंता, श्रेणी-१" या पदांवर
उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात येत होती. तर
"महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-ब" ही
परिक्षा "सहायक अभियंता, श्रेणी-२" या पदांवर उमेदवारांची
भरती करण्यासाठी आयोजित करण्यात येत होती. सन २०१५ पर्यंत
या दोन्ही परिक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येत होत्या.
मात्र सन २०१५ नंतर "महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा
परिक्षा, गट-अ व गट-ब" ही परिक्षा "सहायक कार्यकारी अभियंता,
गट-अ (स्थापत्य)" "सहायक अभियंता, गट-अ (स्थापत्य)" व "सहायक
अभियंता, गट-ब (स्थापत्य)" या पदांच्या भरतीसाठी
संयुक्तरित्या घेण्यात येत होती. या परिक्षेच्या
स्वरुपामध्ये प्रामुख्याने पुर्व परिक्षा व मुख्य परिक्षा
अशा दोन पातळ्या होत्या. पुर्व परिक्षेमधुन निवडलेले
उमेदवार मुख्य परिक्षेस पात्र होते. मुख्य परिक्षेमधुन
पात्र ठरलेले उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत होते
व त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी
द्यावी लागत होती. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत संबंधित विभागांना उमेदवारांना नियुक्ती
देण्याची शिफारस करण्यात येत असे. अशे शिफारस प्राप्त
झाल्यानंतर संबंधित प्रशासकीय विभाग (उदा: जलसंपदा विभाग
अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग) मार्फत नियुक्तीबाबत पत्र
देण्यात येत असे व त्यांना १ वर्षाचे प्रशिक्षणासाठी रुजु
होण्याचे निर्देश देण्यात येत असे.
दि. १५ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या
संकेतस्थळावर जाहीर केलेल्या नवीन कार्यपध्दतीनुसार, "महाराष्ट्र
अभियांत्रिकी सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षा" ही परिक्षा
स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), यांत्रिकी
अभियांत्रिकी (Mechanical Engineering) व विद्युत
अभियांत्रिकी (Electrical Engineering) च्या उमेदवारांसाठी
संयुक्तरित्या घेण्यात येणार आहे. या पुर्व परिक्षेमध्ये
१०० गुणांसाठी १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न
विचारण्यात येतील. त्यामध्ये मराठी विषयाचे १० प्रश्न,
इंग्रजी विषयाचे १० प्रश्न, सामान्य अध्ययन विषयावरील २०
प्रश्न तर अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी यावर ६० प्रश्न
असतील. अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणीचा अभ्यासक्रम पाहिला
असता त्यामध्ये Applied Mechanics, Engineering Mechanics,
Elements of Civil Engineering, Elements of Mechanical
Engineering, Elements of Electrical Engineering या पाच
विषयांवर आधारीत प्रश्न असणार आहेत. हे पाचही विषय
शैक्षणिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रथम वर्षातील विषय
आहेत. याबाबतचा
सविस्तर अभ्यासक्रम या लिंकवर देण्यात आला आहे.
उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे स्थापत्य, यांत्रिकी व
विद्युत अभियंत्यांसाठी संयुक्तरित्या पुर्व परिक्षा
आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय गट-अ व गट-ब च्या
पदांसाठी देखील ही पुर्व परिक्षा संयुक्तरित्या घेण्यात
येणार आहे. या परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य
परिक्षेस बसता येईल. या मुख्य परिक्षा स्थापत्य, यांत्रिकी
व विद्युत अभियंत्यांसाठी वेगवेगळ्या घेण्यात येतील. त्यास
अनुक्रमे "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य), गट-अ
व गट ब (मुख्य) परिक्षा", "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी),
गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा", "महाराष्ट्र अभियांत्रिकी
सेवा (विद्युत), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा" या नावाने
घेण्यात येतील. सदर मुख्य परिक्षा ही उमेदवाराने ज्या
विषयाची पदवी प्राप्त केली आहे, त्याच परिक्षेसाठी तो/ती
पात्र ठरणार आहे. म्हणजेच स्थापत्य अभियंत्यांना केवळ
स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुख्य परिक्षेसाठी बसता येईल.
या परिक्षेमध्ये संबंधित विषयाचे दोन पेपर असतील. या
प्रत्येक पेपरमध्ये १०० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्न असुन त्याचा वेळ दोन तास असणार आहे. प्रत्येक
प्रश्नास दोन गुण असुन प्रत्येक पेपरला २०० गुण असतील. अशा
प्रकारे मुख्य परिक्षेमध्ये २ पेपर प्रत्येकी २०० गुणांचे
असतील.
या परिक्षेचा अभ्यासक्रम :
१)
"महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
(स्थापत्य), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा"
२)
"महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
(यांत्रिकी), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा"
३)
"महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा
(विद्युत), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा"
याबाबत अधिक माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे-
https://www.mpsc.gov.in
http://pravinkolhe.com/academics.html
अशा प्रकारे स्थापत्य, यांत्रिकी अथवा विद्युत यामधील
संबंधित मुख्य परिक्षेमधुन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना
मुख्य परिक्षेसाठी बोलावण्यात येईल. सदर मुलाखत केवळ ५०
गुणांची असुन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संबंधित
विभागाकडे शिफारस करताना केवळ मुख्य परिक्षा आणि मुलाखतीचे
गुण विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाते व त्याआधारे
संबंधितांना नियुक्तीचे पत्र देण्यात येते.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य / यांत्रिकी /
विद्युत), गट-अ व गट ब परिक्षेसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना
मनापासुन शुभेच्छा...!!
महाराष्ट्र शासनाच्या
जलसंपदा विभाग, सार्वजनिक
बांधकाम विभाग तसेच
पाणीपुरवठा व
स्वच्छता विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र
जीवन प्राधिकरण
मधील सहायक कार्यकारी अभियंता, गट-अ
(स्थापत्य), सहायक अभियंता, गट-अ
(स्थापत्य) व सहायक अभियंता,
गट-ब (स्थापत्य) या पदांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपध्दतीचा
अवलंब केला जातो-
महाराष्ट्र स्थापत्य
/ यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-अ व गट-ब
परिक्षेचे प्रमुख तीन टप्पे असुन ते पुढील
प्रमाणे आहेत:
पूर्व परिक्षा
ही मुख्य परिक्षेसाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादेत
सिमित करण्यासाठी घेण्यात येते. या करिता पूर्व
परिक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा (Minimum
Cutoff) किंवा त्यापेक्षा जास्त गुण
मिळविणाऱ्या उमेदवारांस मुख्य परिक्षेसाठी पात्र समजण्यात
येते. तसेच मुख्य परिक्षेकरिता आयोगाने विहित
केलेल्या किमान किंवा अधिक
गुण मिळविणाऱ्या उमेदवारांस मुलाखतीसाठी पात्र समजण्यात
येते.
पूर्व
परिक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात
नाहेत, तसेच प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका आयोगाच्या
संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने पूर्व
परिक्षेचे गुण देखील कळविले जात नाही. एकंदर पूर्व परिक्षा
ही केवळ पास किंवा नापास (Qualified
or Dis-qualified) हे निश्चित करण्यासाठीघेण्यात येते.
अ) परिक्षा योजना:
ब) अभ्यासक्रम:
या परिक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम पहाण्यासाठी येथे
क्लिक करा:
अभ्यासक्रम
क) परिक्षा केंद्र:
सर्वसामान्यपणे ही परीक्षा मुंबई, औरंगाबाद, नागपुर, पुणे
या चार जिल्हा केंद्रावर घेण्यात येते.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-अ व गट-ब
परिक्षेच्या मुलाखतीबाबतचे मार्गदर्शन खालील
व्हिडिओ मध्ये केलेले आहे-
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा
मुलाखत, भाग-१
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा
मुलाखत, भाग-२
The examination pattern for MECSE was radically changed since
MECSE-2011 and major changes were-
Online Form Submission.
Introduction of Preliminary Examination for screening: Maharashtra
Engineering (Civil) Service (Preliminary) Examination
(MECSPE) for AEE & AE1 posts along with mains &
interview
Separate Examination for AE2 posts:-Introduction of Preliminary Examination
for screening: Maharashtra
Engineering (Civil) Service (Preliminary) Examination
(MECSPE) for AE2 posts along with mains & interview. Thus MPSC conducts two
seperate exams for:-
1) AEE/AE1:-
Prelim (Objective Type,100 Marks) + Main(4 papers, 750 Marks,
Subjective) + Interview (100 Marks)2) AE2:-
Prelim (Objective Type,100 Marks) + Main(3 papers, 550 Marks, Objective
Type) + Interview (100 Marks)Maharashtra Engineering
(Civil) Services Examination (MECSE)-2011 & 2012 were
conducted by the MPSC with revised pattern and summary of
the post in various departments and in various cadre is
presented below. Also the number of posts for the
MECSPE-2013 is shown.
Since the
hierarchy of posts and their chances for higher posts are as
per presented above, take utmost care while quoting the
'Preference for post' in the application form. It can not be
altered later on. Also take utmost care for selecting
departments.After year 2000, following
Maharashtra Engineering (Civil) Services Examination (MECSE)
were conducted by the MPSC and summary of the post in
various departments and in various cadre is presented below-
IMPORTANT
POINTS:-Preliminary exam is just
screening test. The marks of Prelim Exam are not intimated. Only those candidates are
allowed to appear for the Main Written Exam who qualifies
the Preliminary Exam. Only marks of Main Exam and Interview
will be considered for merit list. Generally cut-off line
for main exam is decided such that there will be 10 to 12
times candidates will be called upon. Cutoff will be
different for each post/each category. There is no
re-revaluation system for Prelim Exam as it is multiple
choice question based and answer key is available on MPSC
website for self verification by candidate.Generally cut-off line for
interview is decided such that there will be 2 to 3 times
candidates will be called upon and it will be different for
each post/each category. Minimum
Marks for Cutoff in Main Exam are as follows-1) General
Candidates
: Min. 35%2)
Backward Class
: Min. 30%3)
Physically Disabled/Players : Min 20%There are
four exam centre for Prelim & Mains Exam: Aurangabad,
Mumbai, Nagpur and Pune.For
detailed Instructions:-
1)
Instructions for Candidates appearing MECSE
2)
Maharashtra Engineering
(Civil) Services Examination-Class-A-Instructions
3)
Maharashtra Engineering
(Civil) Services Examination-Class-B-Instructions
After Result:-
After declaration of final
results, MPSC ask successful candidates to appear for
Medical Examination. After that MPSC recommends the list of
suitable candidates to respective department and individual
department after prior approval issues resolution for
joining. There is one year training for AEE & AE1 at
Maharashtra Engineering Training Academy, Nasik
after completion of which candidates are appointed at
various offices in the state of Maharashtra. For AE2, there
is no such induction training and they are directly
appointed at work. A candidate joined in
Maharashtra Engineering Service need to clear following
examinations-1) MSCIT or equivalent
Exam.2) Marathi & Hindi Exam (if
applicable)3) Professional Exam.